४ ठिकाणी चकवा, शेवटी घरीच अडकली लाचखोर हवालदार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 28, 2025
पतीने पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच मागितली.त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना दौलताबाद पोलिस ठाण्यातील महिला हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी २७ नोव्हेंबर पकडले. ही कारवाई गारखेडा परिसरात केली. लता बाळासाहेब दराडे ३७,रा. एमरॉल्ड सिटी,गारखेडा परिसरअसे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे