नगर: कर्डिले साहेबांनी माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम केलं - पंकजा मुंडे
अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने सकाळी निधन झालं त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या... यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केलं...मी ही असा अचानक वडिलांना गमावला आहे, त्यामुळे त्या कुटुंबाच्या वेदना काय असतील हे मला माहित आहे... त्यामुळे या पुढील काळातही मी भक्कमपणे कुटुंबाच्या पाठीमागे उभी राहील असंही मुंडे म्हणाल्या.