जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे मोठे 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले. या धडक कारवाईत ६० हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive