नाशिक: वडाळा गाव येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या चार गाईंची सुटका; इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Oct 18, 2025 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी त्यांना दाबून ठेवल्याप्रकरणी एकावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार गाईंची सुटका करण्यात आली आहे.वडाळा गावामधील मदिना नगर येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी त्यांना डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. निर्दयीपणे चार गाईंना दाबून ठेवल्याचे पोलिसांना निदर्शनास आले.त्यांची सुटका करण्यात आली आहे.