प्रगती प्रकल्पास राज्य मंत्री मंडळाची मान्यता
3.7k views | Gondia, Maharashtra | Sep 9, 2026 *महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित बळकटी देणाऱ्या ‘प्रगती’प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता* *४,२५० कोटींच्या प्रगती प्रकल्पाला मंजुरी; पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर* मुंबई, दि.08.09.26 : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्रगती’ (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration) या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सन २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹४,२५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे ₹२,९७५ कोटी कर्ज, तर ३० टक्के म्हणजे ₹१,२७५ कोटी राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला प्रकल्पात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, CKD, COPD, स्ट्रोक, मानसिक आरोग्य, डायबेटिक रेटिनोपॅथी, फॅटी लिव्हर, पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पिस सेवांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर screening, counselling, जनजागृती, Behaviour Change Communication आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे capacity building यावर भर दिला जाणार आहे. Breast, Cervical आणि Oral Cancer यांच्या तपासणी व निदान सुविधाही अधिक सक्षम करण्यात येणार