मिरज: आरग येथे क्रेन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Aug 22, 2025 आरग (ता. मिरज) येथे क्रेन उटलून झालेल्या अपघातात क्रेन सहायकाचा मृत्यू झाला. विवेक ऊर्फ संतोषकुमार भूपाल चौहान (रा. चौरा, खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक माने यांनी क्रेनचालक अक्षय भगवान भोसले (रा. नागेवाडी, ता. तासगाव) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २२ जुलै रोजी हा अपघात झाला होता. क्रेनचालकाने हयगयीने वाहन चालवल्याने क्रेन उलटली होती. यात क्रेनचा हक विवेक याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यात