लातूर :-आषाढी एकादशी निमित्त माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमाअंतर्गत रुद्राक्ष ट्रॅव्हल्स आणि राधिका ट्रॅव्हल्स यांच्या सहकार्याने ग्रामीण व शहरी भागातील ३५१ भाविक वारकऱ्यांना ७ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वारी घडवून आणण्यात आली. सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३५१ वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी लातूर मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले.