Pune PMC मनपा अतिक्रमण विभागाचा भोंगळ कारभार? क्लर्कच चालवत होते निरीक्षकपदाचे काम!
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चव्हाण नावाचे कर्मचारी अतिक्रमण निरीक्षक म्हणून कामकाज करत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वतः क्लर्क असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर विभागातील प्रशासकीय पारदर्शकता, जबाबदाऱ्या आणि अधिकार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित कर्मचारी नेमक्या कोणत्या अधिकाराखाली कारवाई करत होते? नागरिकांवर दबाव निर्माण केला जात होता का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या पत्रकारांनी केलेल्या पाहणी आणि प्रश्नोत्तरांमधून हा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता याप्रकरणी मनपा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune City, Pune | Jun 25, 2026