अक्कलकुवा: रस्त्याअभावी गर्भवती महिलेची घरीच प्रसूती, मोठे तोलवापाडा येथील हृदयद्रावक घटना
रस्ता अभावी गर्भवती महिलेची गरज प्रसूती झाल्याची हृदय द्रावक घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथे घडले आहे. चार किलोमीटर पायपीट लाकडी पुरावरील जीवघेणा प्रवास बांबूच्या झोळीतून महिलेला व नवजात बालकाला करावा लागला. चार किलोमीटरचा रस्ता मंजूर असतानाही केवळ सातशे मीटर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. नदीला पूर असल्यामुळे महिला रुग्णालयापर्यंत पोहोचू शकले नसल्याने प्रसूती घरीच करावी लागली. बालक आणि माता दोघेही सुखरूप आहेत.