नागपूर शहर: प्लॉट विक्रीच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: रितेश आहेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी 10 जुलैला दुपारी 12:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत प्लॉट विक्रीच्या नावाखाली १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भास्कर बारापात्रे यांनी २०१६ मध्ये आरोपींकडून एक प्लॉट खरेदी केला होता. मात्र, नुकत्याच केलेल्या पाहणीत तिथे दुसऱ्याचे फलक असल्याचे दिसून आले. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच, पीडिताने तक्रार दाखल केली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आह