ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात...
.
.
लोणी काळभोर, ता. १५ : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी (दि. १५) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने अभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाषअप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुलअप्पा काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यालयाचे हितचिंतक विठ्ठल (मामा) काळभोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन प्रमुख तथा विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच यशाचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले. आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
.
.
.
#LoniKalbhor #SchoolReopening #ShalaPraveshotsav #PuneSchool #LoniKalbhorNews #BackToSchool #EducationMaharashtra #StudentLife #KalbhorPatil #NewAcademicYear #लोणीकाळभोर #शाळाप्रवेशोत्सव #पहिलादिवस #नवीनशैक्षणिकवर्ष #पुणेन्यूज #विद्यार्थीजल्लोष #शिक्षण #शाळा #काळभोर #हवेलीतालुका
Haveli, Pune | Jun 15, 2026