मुरुड: कोर्लई समुद्रात संशयित पाकिस्तानी बोटीचा तपास; सुरू सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर, किनारपट्टीवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू
Murud, Raigad | Jul 7, 2025 रविवारी पोलिसांना आलेल्या अलर्ट नुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता. उजडल्यानंतर आता ती संशयित बोट कोर्लई पासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.