पनवेल: मिसिंग लिंक 1 मेपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला
Panvel, Raigad | Apr 29, 2026 मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतिक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून, हा मार्ग १ मे २०२६ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. तसेच या मार्गावरील वेगावर देखील मर्यादा घालण्यात आल्या आहे.