समुद्रपूर: ताडगाव रस्त्यावरील पुल पुराने खरडला:वहीवाट झाली धोक्याची: तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
जिल्हासीमेवर असलेल्या समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल २० जुलैला ४ वाजता पुराच्या पावसाने खरडला असल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे.तरी तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आज २१ जुलै रोजी १ वाजता सरपंच विनायक श्रीरामे व नागरीकांनी केली आहे. हा पुल पुराच्या प्रवाहाणे पुराची कडा पूर्णतः खरडली तर पुलावर खोल खड्डे पडले. त्यामुळे वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे.या गावात ताडगाव बस सेवा सुरु आहे. मात्र पूल खचल्याने ही बस सेवा गावात पोहचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.