नांदेड: हद्दपार असतानाही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणे एका आरोपीस भोवले, नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद
Nanded, Nanded | Jul 5, 2025 नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोनि चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी ऋतिक गोपाळ पदमवार वय वर्ष 26 या विरुद्ध हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, सदर आरोपी हा 6 महिन्यासाठी हद्पार असताना हा आज दि. 5 जुलै रोजी लपून छपून ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याची माहिती मिळाल्याने त्यास आज दुपारी 2 च्या सुमारास सापळा लावून जेरबंद करण्यात आले आहे, त्यावर 142 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास देण्यात आली आहे.