शहापूर: शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांचा करपटवाडी दौरा
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी येथे शेतकऱ्यांना भेट देऊन पिकांची पाहणी केली आणि पीक नुकसान भरपाईसाठी शासनाची मदत मिळेल असा विश्वास दिला. दिवाळीच्या सणात शेतकरी बांधवांना अन्नधान्य किट व भेटी वाटप करण्यात आल्या.