परतूर: गोळेगाव येथे मंजूबाबा करतो महिलांवर अघोरी उपचार,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Partur, Jalna | Apr 11, 2026 आज दिनांक 11 एप्रिल 2026वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गोळेगाव येथून एका घरातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो व्हिडिओ एका नागरिकाने काढला असून यामध्ये मंजू बाबा नावाचा एक महाराज महिलांवर अघोरी उपचार करत आहे त्यांच्या अंगावरून लिंबू मिरच्या तसेच भूत वादा करणे कवटाळ आणि संतान प्राथमिक च्या नावाखाली उपचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या बाबावर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.