अंबड: जालना अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाची मोठी कारवाई…
Ambad, Jalna | Apr 8, 2026 जालना अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाची मोठी कारवाई… : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गायरान जमिनीवर विनापरवाना सुरू असलेले हे केंद्र सील करण्यात आले आहे. ‘कृषी अवजारे सेवा केंद्र’च्या नावाखाली सुरू असलेल्या या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळराजे आवारे पाटील यांना यापूर्वीच सोलापूर पोल