अंबरनाथ: अंबरनाथ मध्ये भरधाव ट्रेलरने दिली अनेक वाहनांना धडक
आज दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना धडक दिली. चालकाने चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीये. या मद्यधुंद ट्रेलर चालकाला पोलिस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडलं. या अपघातामध्ये ५० वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.