परतूर: पाटोदा येथे कुस्ती स्पर्धेचे भा.ज.पा.युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
Partur, Jalna | Apr 5, 2026 आज दिनांक 5 एप्रिल 2026वार रविवार रोजी दुपारी 2 वाजता परतुर तालुक्यातील पाटोदा येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी त्यांनी उपस्थित स्पर्धकांना संवाद साधत कुस्तीचे महत्त्व पटवून दिले आहे, यावेळी परिसरातील कुस्तीशोकीन तसेच पाटोदा गावातील नागरी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.