परतूर: रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रवाशांची व नागरिकांची मागणी
Partur, Jalna | Jul 7, 2026 आज दिनांक 7 जुलाई 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे ,कारण या ठिकाणावरून रोज रेल्वेने हजारो प्रवासी रजा करतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी होत आहे.