अक्कलकुवा: आदिवासी गौरव दिन अक्कलकुवा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न; आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम संपन्न
आदिवासी गौरव दिनानिमित्त अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभा मंडपात दोन दिवसीय विविध कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रम हे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. सभेनंतर अक्कलकुवा शहरातून पारंपारिक ढोलवाद्य, तुरवाद्य, पावा, बासरीच्या ठेक्यावर सवाद्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली.