अक्कलकुवा: चानवाई शिवारात बकऱ्यांनी केले नुकसान,बकरी मालकाला दगडाने मारहाण;मोलगी पोलिसात दोघांवर गुन्हा
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील चानवाई शिवारात ८ ऑगस्ट रोजी दुपारी बकऱ्यांनी कागडा वसावे यांच्या शेतात नुकसान केले याचा राग आल्याने बकरी मालक वाण्या वसावे यास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी रात्री मोलगी पोलीस ठाण्यात कागडा वसावे तेजला वसावे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.