अक्कलकुवा: भुमी अभिलेख कार्यालया मार्फत उमरकुवा येथे सनद वाटपाचा कार्यक्रम आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाला.
गावठाण जमा बंदी प्रकल्प, स्वामित्व योजनेंतर्गत उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालया मार्फत उमरकुवा येथे सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते नागरिकांना सनदचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उमरकुवा गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच बबिता वसावे, राजेंद्र वसावे, आदीं उपस्थित होते.