अक्कलकुवा: वालंबा वडीवार शिवारात मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू, मोलगी पोलिसात प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील वालंबा वडीवार शिवारात 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पायी चालणाऱ्या वसंत वळवी या युवकास पल्सर मोटर सायकलने धडक दिली. अपघातात वसंत वळवी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी दुपारी मोलगी पोलीस ठाण्यात प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.