कोरची: कोरची जवळ गोवंशाची अवैध तस्करी कोरची पोलीसानी हाणून पाडली,६६ गोवंशाची मूक्तता ३ आरोपीना अटक
कोरची - बोटेकसा भिमपूर मार्गाने कोरची कडे येणार्या दहा चाकी कंटेनर मध्ये अवैधपणे गोवंशाची होणारी वाहतूक कोरची पोलीसांचा सतर्कतेने हाणून पाडण्यात येत ६६ गोवंशाची मूक्तता करीत ३ आरोपीना अटक करण्यात आली अशी माहिती आज दि.५ जूलै शनिवार रोजी सांयकाळी ५ वाजता कोरची पोलीस स्टेशन चा वतीने प्रसिद्धि पत्रका द्वारे देण्यात आली आहे.कोरची तालूका हा छत्तीसगढ़ राज्याला लागून आहे येथून नागपूर,अमरावती तसेच तेलंगाना राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध पणे गोवंशाची तस्करी करण्यात येते.