पुनावाला ग्रुपच्या फ्लॅशर गाड्यांवर पोलिसांचा दणका! तक्रारीनंतर QRT वाहनांवर दंडात्मक कारवाई
पुण्यात लाल-निळे फ्लॅशर लावलेल्या पुनावाला ग्रुपच्या QRT वाहनांचा मुद्दा चर्चेत आला आहे. या वाहनांवर पोलिसांसारखे फ्लॅशर वापरले जात असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
अमोल नाना तुपे यांनी 21 सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार करत संबंधित वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी पुनावाला ग्रुपच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात लाल-निळे फ्लॅशर वापरण्याचा अधिकार आणि त्यासाठी आवश्यक परवानगी याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, पुनावाला ग्रुपकडून आता फ्लॅशर वापरण्यासाठी RTO कडे परवानगीचा अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे.
या वाहनांचा वापर QRT म्हणजेच Quick Response Team साठी केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, फ्लॅशरच्या वापराबाबत नियम आणि परवानग�