दिनांक 18 नोव्हेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान धनेगाव ग्रामीण पोलिसांनी आवेदरीत्या रेती चोरी करणाऱ्या हायवा टिप्पर एम.एच.26 एस.एफ. 7699 हा हायवा 40 लाख रुपये किंमतीचा तसेच 10 ब्रास वाळू 50 हजार रुपये किंमतीचे तसेच एकूण चाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलीस हेडकॉन्स्टेबल जमीर शफीर अहेमद यांच्या यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम विठ्ठल सावते (24) व्यवसाय चालक रा. आमुदरा आणि इतर एक अज्ञात आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल