माझे गाव आरोग्य संपन्न गाव : दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण
204 views | Gondiya, Gondia | May 12, 2026 माझे गाव आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज ११ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, दवनीवाडा येथे एच. पी. व्ही. लसीकरण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सत्रात धापेवाडा उपकेंद्रातील एकूण ९ किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी एच. पी. व्ही. लस टोचण्यात आली.