प्रशासनाची वाट न पाहता बावधनकरांनी स्वतः बुजवला मोठा खड्डा! नागरिकांचा अनोखा पुढाकार
पुण्यातील बावधनमध्ये नागरिकांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत मोठा खड्डा दुरुस्त केला. 👏🚨
रविवारी बावधन सिटीझन फोरमचे सदस्य आणि खड्डे दुरुस्ती करणारे कामगार सन-विंड्स आणि बाल्टुका कॉर्नरजवळील मोठा खड्डा बुजवण्यासाठी एकत्र आले.
परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निधीतून हे दुरुस्तीचे काम करण्यात आले. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास तसेच यापूर्वी झालेल्या अपघातांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात होती.
रस्ता सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात बावधनकरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामावर देखरेख ठेवली आणि दुरुस्तीला सहकार्य केले. 👀
प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनी उचललेलं हे पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे.
बावधनकरांनी स्वतः बुजवला मोठा खड्डा!
प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांचा पुढाकार!
खड्ड्यांमुळे अपघात, अखेर नागरिकच मैदानात!
निधीही नागरिकांचा, दुरुस्तीही नागरिकांची!
#Bavdhan #BavdhanNews #Pune #PuneNews #Pothole #RoadSafety #CitizenInitiative #CivicIssues #PuneRoads #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 24, 2026