मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा ते पार्डी मार्गावर दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिंपळखुटा येथील अजय प्रल्हादराव मोहोड नावाच्या इसमाला आज दिनांक 31 डिसेंबरला सकाळी सात वाजता मोर्शी पोलिसांनी अटक करून त्याचे ताब्यातून यामाहा कंपनीच्या दुचाकी सहित दोन लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी त्यांचे अधिनस्त डीबीपथकाला थर्टी फर्स्ट चे अनुषंगाने अवैधधंदे करणाऱ्या इसमाविरुद्ध कार्यवाही दिल्यावरून ही कार्यवाही करण्यात आली