आज दिनांक दोन जानेवारीला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहरातील माळीपुरा येथे रहिवासी असलेले शेतकरी गोपी किसन बियाणी यांच्या शेतातून, दोन बैलांसह बैलबंडी चोरीला गेल्याची घटना दिनांक 31 डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली आहे. याबाबतीत गोपी किसन बियाणी यांनी दिनांक एक जानेवारीला 11 वाजून 36 मिनिटांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे