समुद्रपूर: जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठीच्या तालुका संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाला सरपंच संघटनेचा पाठिंबा
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभा श्रेत्रात मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जाम येथे होण्याच्या मागणीसाठी १२ ऑगस्ट पासून तालुका संघर्ष समितीच्या वतीने समुद्रपुर येथिल बस स्थानक परिसरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.या उपोषणाला १३ ऑगस्टला सरपंच संघटनेच्या वतीने समर्थ जाहीर केले असुन यासंबंधी जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात पत्र दिले आहे.यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी ,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.