समुद्रपूर: पोलीस पाटील संघटने तर्फे शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांचा सत्कार
समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी प्रसंगावधान दाखवत गावातील तरुणांच्या मदतीने २८ जुलै रोजी वाघाडी नाल्याच्या पुरात अडकलेल्या तीन जणांचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक म्हणून ११ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने समुद्रपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार शेगावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष समीर धोटे,सचिव आशिष पाटील अविनाश घोरपडे, वंदनाताई धोटे आदिंसह पोलिस पाटील उपस्थित होते.