समुद्रपूर: आसोला येथे बकऱ्या बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी केली पतीपत्नीसह लाकडी काठीने मारहाण
गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसोला येथे १० ऑगस्टला दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घरा शेजारी राहणाऱ्या दोघांनी बकऱ्या बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी केली पतीपत्नीसह लाकडी काठीने मारहाण केल्याची माहिती आज रविवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. फिर्यादी विद्या नाचणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या व त्यांचे पती गोविंदराव नाचणकर घरी बसून असतांना यादव तळवेकर यांच्या बकऱ्या त्यांच्या घरासमोर आल्या असता बकऱ्या बांधून ठेवत जा असे म्हणताच वाद केला.