शिवणी येथे शनिवारी पाचवी बौद्ध धम्म परिषद; सामाजिक न्याय भवनात भन्ते धम्मशील थेरो यांची पत्रकार परिषदेत माहिती
बीडमध्ये पाचवी बौद्ध धम्म परिषद बीड तालुक्यातील शिवणी येथे अखिल भारतीय पाचवी बौद्ध धम्म परिषद शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन भन्ते धम्मशील थेरो यांनी केलं बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भंते धम्मशील थेरो बोलत होते. यावेळी ते म्हणाले धम्मभूमी डॉ. भदंत आनंद कौशल्यायन नगर शिवनी येथे 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्तान