श्रीगोंदा: "जनतेला काहींच्या भरोशावर सोडणं योग्य नाही" — माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा खासदार लंके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा
"जनतेला काहींच्या भरोशावर सोडणं योग्य नाही" — माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा खासदार लंके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा "मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्केही काम सध्याच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं नाही. माझा पराभव झाला, पण मी जनतेसाठी थांबलो नाही. आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता. जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही," अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली