कोंढव्यात स्वच्छता आणि प्रकाशव्यवस्थेत मोठा बदल! अली सुंडके, मुज्जम्मील शेख यांच्या पाठपुराव्याला यश
पुण्यातील कोंढवा येथील शिवनेरीनगर परिसरात स्वच्छता आणि प्रकाशव्यवस्थेबाबत महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सामाजिक कार्यकर्ते अली अनिस सुंडके आणि ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’चे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
प्रभाग क्रमांक १९ आणि २१ मधील शिवनेरीनगर परिसरात अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० नवीन विद्युत पोल आणि पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरातील रस्त्यांवर प्रकाशाची व्यवस्था सुधारली आ
Pune City, Pune | Oct 17, 2026