नागपूर ग्रामीण: धक्कादायक!पोलिसांचे एस्कॉर्ट पथक अवघ्या दोन महिन्यात बरखास्त
नागपूरमध्ये पोलिसांचे विशेष एस्कॉर्ट पथक तडकफडकी बरखास्त करण्यात आले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या या पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे होते.पथकाचा मूळ उद्देश बाजूला सारून कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्याने आणि पथकाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींमुळे ही कारवाई झाली.पथक बरखास्त करून कोळी यांची मूळ ठिकाणी बदली करण्यात आली आहे. हे पथक बरखास्त झाल्यामुळे पोलिसांना देखील आता धडकी भरली आहे