मुंबई उपनगर: मुंबईत किन्नर महासंघटनेचा वर्धापन दिन; 1500+ तृतीयपंथी बांधवांनी केला सहभाग
मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिरात किन्नर महासंघटनेचा वर्धापन दिन पार पडला. समाज कल्याण अधिकारी पुष्पलता घटारे यांनी तृतीयपंथी कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्यभरातून १५०० हून अधिक तृतीयपंथी बांधवांनी हजेरी लावली.