नागपूर शहर: बालाजी नगर येथे घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपींना अटक, 2 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
16 सप्टेंबरला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार,शहरात घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत सुमारे २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि एक आयफोनचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद फैजाज वल्द एजाज अन्सारी आणि अफरोज अन्सारी अशी आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.