नाशिकमध्ये शेतजमिनीवरून वाद चिघळला! बँकेवर गंभीर आरोप, पोलिसांवरही दादागिरीचा आरोप
नाशिक जिल्ह्यातील निळवंडी रोड, जाधव वस्ती परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित महिला शेतकरी असून, गट क्रमांक 888 वरील जमिनीबाबत बँक कर्ज आणि विक्री व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कॅनरा बँकेच्या अशोक स्तंभ शाखेतून ₹7.67 लाखांचे कर्ज घेतले होते. बँकेच्या ‘On Time Settlement’ योजनेअंतर्गत सुमारे ₹6.50 लाख भरले असतानाही, चुकीची माहिती आणि कागदपत्रे सादर करून सुमारे ₹2.5 कोटी मूल्याची जमीन ₹73 लाखांना विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणि कोर्ट रिसिव्हर घटनास्थळी आले असता शेतकरी कुटुंबीयांनी शांततेत विरोध केल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून कुटुंबीयांशी गैरवर्तन, मारहाण आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अशाच ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Subscribe करा. व्हिडिओ Like आणि Share नक्की करा.
#NashikNews #FarmerNews #Nashik #CanaraBank #FarmerIssue #BankLoan #LandDispute