मानगाव: निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करा; राष्ट्रवादी कॉ. शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या पंधरा दिवसांत तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार, कामाची देखरेख करणारे अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.