पातुर: मध्य प्रदेशातील शिवणी येथे कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात ,पातुर येथील दोघांचा अपघातात मृत्यू
Patur, Akola | Aug 8, 2025 मध्य प्रदेशातील शिवणी येथे कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी मध्यरात्री बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चोर गरठिया गावाजवळ भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला व पायी चालणाऱ्या कावडधाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश विजय पोहरे (दोघेही रा. पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..सूत्रांच्या माहितीनुसार, भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे