सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या, बलिदान करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यामाध्यमातून आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले