नागपूर शहर: गणेशपेठ पोलिसांची कामगिरी: वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
12 जुलैला दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या दोन मोटरसायकली आणि एक ॲक्टिवा मोपेड असा एकूण ३७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना संशयास्पद स्थितीत वाहन चालवताना एक आरोपी मिळून आला. अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने ही वाहने चोरल्याची कबुली दिली. या टोळीकडून गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.