समुद्रपूर: गिरड मातंग समाजाचे जेष्ठ नेते फकिरा खडसे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित
गिरड येथील मातंग समाजाचे जेष्ठ नेते फकिरा खडसे यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा न्याय मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्या शुभहस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२४ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.हि माहिती २८ जुन रोजी १२ मिळताच सर्वच श्रेत्रातून अभिनंदन करण्यात आले.