शेगाव: बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच असून शेगाव शहरातील बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास
बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.याबाबत मनिष गजानन घुईकर वय 31 वर्ष रा उन्हाळखेड पोस्ट श्री क्षेत्र नागझरी यांनी त्याची MH28 BJ 2602 बस स्थानक येथे उभी केली होती.कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.