उल्हासनगर: भीम कॉलनी परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील भीम कॉलनी परिसरात आज सकाळी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या सोमनाथ पुरसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी दारू कुठून आणली याचा देखील तपास पोलीस करत आहेत.