देवळी: आधी बारमध्ये मस्करी;मग मैदानावर राडा;पुलगावात दोन मित्रांच्या गटात जीवघेणी हाणामारी:मित्रानेच केला मित्रावर हल्ला
Deoli, Wardha | Jan 25, 2026 पुलगाव येथून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका जुन्या वादातून आणि दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर आता भीषण हाणामारीत झाले आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पुलगावच्या गांधीनगर मैदानावर घडली असून, धक्कादायक म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे आज 25 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे